वृंदावनला अडकलेले भाविक परळीत परतले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 March 2020

खासगी बसद्वारे परळीत आलेल्या भाविकांची उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्यात कोरोनासंदर्भात कोणतीही लक्षणे आढळली नसली तरी सतर्कता म्हणून त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

परळी वैजनाथ (जि. बीड) - लॉकडाऊनमुळे वृंदावन येथे अडकलेले येथील ९३ भाविक रविवारी (ता. २९) रात्री उशिरा शहरात दाखल झाले. त्यासाठी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केले.

एका खासगी बसद्वारे येथे आलेल्या या भाविकांची उपजिल्हा रुग्णालयातर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्यात कोरोनासंदर्भात कोणतीही लक्षणे आढळली नसली तरी सतर्कता म्हणून त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लटपटे यांनी सांगितले आहे. प्रशासनातर्फे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली असून तहसीलदार विपीन पाटील लक्ष ठेवून आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees stranded in Vrindavan returned to Parli