Majalgaon News : तरुणांच्या मारहाणीत ढाबाचालकाचा मृत्यू; मुलगा गंभीर, पाच जणांवर गुन्हा दाखल, माजलगावातील घटना
Majalgaon Crime : माजलगाव येथील नागडगाव फाट्यावर रविवारी रात्री तरुणांनी केलेल्या मारहाणीत ढाबाचालक महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा आशुतोष गंभीर जखमी झाला. पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव : तरुणांनी केलेल्या मारहाणीत ढाबाचालकाचा मृत्यू, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना येथून जवळच नागडगाव फाट्यावर रविवारी (ता. २०) रात्री घडली. तरुणांच्या टोळक्यात झालेले भांडण सोडविण्यासाठी हे दोघे गेले होते.