
Dhananjay Deshmukh: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचं बीडमध्ये सातत्याने उदात्तीकरण सुरु आहे. कधी बॅनरवर फोटो झळकतात तर कधी ओबीसी आंदोलनात त्याच्या नावाचा जयजयकार होतो. पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात तर कहरच झाला. चक्क वाल्मिकचा फोटो असलेले बॅनर लोकांनी झळकावले. त्यामुळे त्या मेळाव्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली. आता पुन्हा वाल्मिकच्या नावाचे एक सोशल मीडिया टेम्प्लेट फिरत आहे, त्यात वाल्मिकचं नाव जिवंत ठेवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली.