धनंजय मुंडेंची 'बाप' कामगिरी; रुळावर सापडलेल्या मुलीचे स्वीकारले पालकत्व

प्रा. प्रविण फुटके
Tuesday, 25 February 2020

या गंभीर प्रकरणाचा पोलिस तपास घेत असून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या बाबीची तात्काळ दखल घेत या मुलीचे पालकत्व स्वीकारून पुढील उपचाराची सोय केली आहे. मंत्री मुंडे यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे व डॉ. संतोष मुंडे तसेच वाल्मिक कराड यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात येवून पाहणी केली.

परळी वैजनाथ (जि. बीड) : शहरात सोमवारी (ता.२४) रात्री जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला रेल्वे पटरीजवळ काटेरी झुडुपात टाकून दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या नकोशीचे पालकत्व स्विकारले. महाशिवरात्री महोत्सवादरम्यान हा प्रकार घडला असल्याने या मुलीचे 'शिवकन्या' असे नामकरण केले आहे.

हेही वाचा - मराठ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नाही

सदरील स्त्री जातीचे नवजात अर्भक काटेरी झुडपात टाकण्यात आले होते. रात्री ८ च्या सुमारास मुलीच्या रडण्याचा आवाज परिसरातील नागरिकांनी ऐकल्यानंतर हा प्रकार समोर आला. हा निर्दयी प्रकार नेमका कोणी केला हे अजून समजू शकले नाही.

या गंभीर प्रकरणाचा पोलिस तपास घेत असून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या बाबीची तात्काळ दखल घेत या मुलीचे पालकत्व स्वीकारून पुढील उपचाराची सोय केली आहे. मंत्री मुंडे यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे व डॉ. संतोष मुंडे तसेच वाल्मिक कराड यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात येवून पाहणी केली. या नवजात 'शिवकन्येला' जीवदान मिळावे म्हणून डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा - इथे झाली ३६ कॉपीबहादरांवर कारवाई

या मुलीची तब्येत चांगली होताच तिला पुण्यातील सर्व सोयीयुक्त बालकाश्रमात हलवण्यात येईल, तसेच पुढील संगोपन, शिक्षण ते अगदी लग्नासहित या बालिकेची संपुर्ण जबाबदारी आमची असेल असे धनंजय मुंडे यांनी सांगीतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhananjay munde adopt child beed News