esakal | धनंजय आणि पंकजा कशामुळे दुरावले, वाचा....
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde and Dhananjay Munde

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीत अपघाती मृत्यू झाला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बहिणीसमोर आव्हान ठेवले. पण, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना 25 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये मात्र त्यांना यश आले.

धनंजय आणि पंकजा कशामुळे दुरावले, वाचा....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या चुलत भाऊ-बहिणीमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. या दोघांमध्ये  चांगलेच वैर असून, मुंडे कुटुंबातला वाद कशामुळे उफाळला याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

भाजपचे दिवंगत खासदार गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडेंचे ज्येष्ठ बंधू पंडीतअण्णा मुंडे यांचा चिरंजीव धनंजय मुंडे अशी या दोघांची ओळख. पंडीतअण्णा मुंडे स्थानिक राजकारण संभाळण्याची जबाबदारी पाड पाडत होते. गोपीनाथ मुंडे राज्याच्या राजकारणात सक्रीय होते. गोपीनाथ मुंडेंमुळे पंडीतअण्णा मुंडे यांना राजकीय प्रतिष्ठा मिळाली. धनंजय मुंडेही सुरवातीला भाजपकडून जिल्हा परिषदेत सदस्य झाले. त्यानंतर ते भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष झाले. दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष झाले. 

2009 मध्ये गोपीनाथ मुंडे जेव्हा राष्ट्रीय राजकारणात गेले, तेव्हा धनंजय मुंडे यांना वाटत होते, की त्यांची जागा मिळावी. पण, त्याच काळात महिला बचत गट, जलसंधारणाची कामांतून पंकजा मुंडे मतदारसंघात सक्रीय होत्या. धनंजय मुंडे सक्रीय राजकारणात असूनही पंकजा यांचे नाव समोर आल्याने ते नाराज झाले. त्या दरम्यान त्यांना भाजपने विधान परिषदेवर घेतले. त्यानंतर 2012 मध्ये नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी काही भाजप व राष्ट्रवादीकडून समर्थक निवडून आणले. त्यानंतर त्यांचा गट करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेथून मुंडे कुटुंबातील वादाला सुरवात झाली. भगवान गडावर दसरा मेळाव्यावेळी नामदेवशास्त्री आणि गोपीनाथ मुंडे यांनी भाषण करताना धनंजय मुंडे बंडखोरी करू शकतात असे संकेत दिले होते. त्यानंतर झालेही तसेच धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीत अपघाती मृत्यू झाला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बहिणीसमोर आव्हान ठेवले. पण, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना 25 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये मात्र त्यांना यश आले. पण, लोकसभा आणि विधानसभेत त्यांना यश मिळविता आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना अपयशच आले. आता पुन्हा एकदा ते बहिणीसमोर उभे आहेत आणि कडवी लढत देत आहेत.

loading image