
Banjara ST Reservation: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २ सप्टेंबर २०२५ रोजी एक जीआर काढून सरकारने तसा निर्णय घेतला. याच हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख अनुसूचित जमाती असा करण्यात आलेला आहे. त्यामुळे बंजारा समाजाकडून एसटी आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढू लागलाय.