धनंजय मुंडेंना आणखी एका प्रकरणात क्लिन चीट, राज्याच्या लोकायुक्तांनी फेटाळले आरोप

Dhananjay Munde राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले ऑफिस ऑफ प्रॉफिटचे आरोप राज्य लोकायुक्तांनी फेटाळून लावले आहेत. कोर्टानंतर आता राज्य लोकायुक्तांनी धनंजय मुंडेंना दिलासा देत याचिकाकर्त्यांना फटकारलंय.
धनंजय मुंडेंना आणखी एका प्रकरणात क्लिन चीट, राज्याच्या लोकायुक्तांनी फेटाळले आरोप
Updated on

राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या आरोपात तथ्य नसल्याचं सांगत राज्य लोकायुक्तांनी क्लिनचीट दिलीय. धनंजय मुंडे यांच्यावर कृषी साहित्य खरेदी आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी याआधी याचिकाकर्त्यांना कोर्टानेही दणका दिला होता. त्यानंतर आता राज्य लोकायुक्तांनीही धनंजय मुंडे यांच्या बाजूने निकाल देत आरोप फेटाळून लावले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com