

Manoj Jarange: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट धनंजय मुंडे यांनी रचल्याचा जरांगेंचा आरोप आहे. त्यापोटी मारेकऱ्यांना अडीच कोटी रुपये देऊ केले होते, असाही आरोप जरांगेंनी पत्रकार परिषदेद्वारे केला होता. त्याला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ओबीसी एल्गार मेळाव्यात मी फक्त दोन प्रश्न विचारले म्हणून मला संपवण्याचा कट रचला जातोय, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला.