
OBC Melava Beed: बीडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार मेळावा पार पडला. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या मेळाव्यामध्ये आमदार धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण केलं. आपला विरोध मराठा समाजाला नाही तर एका व्यक्तीला आणि एका प्रवृत्तीला आहे, असं म्हणत त्यांनी मनोज जरांगेंचं नाव न घेता टीकास्र सोडलं.
धनंजय मुंडे म्हणाले की, आज मी इथे उभाय तो माझ्या ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी. मला कोणत्याही समाजाला विरोध करायचा नाही. भुजबळ साहेब आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी एक खंत व्यक्त केलीय. परंतु स्व. मुंडे साहेब आज हयात असते तर ही वेळ आली नसती. त्यांची बरोबरी कोणी करु शकत नाही.