
Walmik Karad Latest News: संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचे आणखी कारनामे पुढे येऊ लागलेले आहेत. त्याने एका दलित व्यक्तीला केलेली शिवीगाळ व्हायरल झाली आहे. वाल्मिक कराडचे एकेकाळचे सहकारी आणि त्याच्या जाचामुळे बाजूला झालेले विजयसिंह बांगर यांनी ही ऑडिओ क्लिप समोर आणली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी कराडवर गंभीर आरोप केले.