
धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तर पंकजा मुंडे यांना पर्यावरण व पशुसंवर्धन अशी खाती मिळाली आहेत. भलेही दोघांची खाती थेट लोकांशी संबंधीत नसली तरी महत्वाची मानली जातात.
आता जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला मिळते, याकडे लक्ष लागले आहे. पालकमंत्रीपदासाठी मुंडे भावंडांसह बाबासाहेब पाटील तसेच अतुल सावे यांचीही नावे चर्चेत आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, विस्कटलेली प्रशासनिक व सामाजिक घडी, सत्तापक्षातील आमदारांची मतेही यात महत्वाची मानली जातात.