विरोध बाजूला ठेवून एकाच व्यासपीठार मुंडे बहीण-भाऊ

Dhahnjay And Pankaja Munde
Dhahnjay And Pankaja Munde

बीड : जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावरील संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व माजी मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे हे बहीण-भाऊ शुक्रवारी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. विरोधासाठी विरोध न करता सामाजिक निर्णय, कार्यक्रमात ही भावंड एकत्र दिसत आले आहेत.


पंकजा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत दोघे बहीण भाऊ कीर्तनाच्या कार्यक्रमात दिसत आहेत. प्रत्येक वर्षी संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी धनंजय मुंडे येत असतात. यंदाही ते आले होते. संत वामनभाऊ यांच्या महापूजेच्या वेळी मुंडे उपस्थित होते. या प्रसंगी गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्यासह भाविक उपस्थित होते.


बैठक गाजली
नुकतीची जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी धनंजय मुंडेंनी बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना बैठकीतून हाकलून लावले होते. तसेच नियोजन समितीच्या सदस्यांना तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर मुंडेंच्या उपस्थितीत गुट्टे यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com