esakal | मुंडेंनी घेतले वैजनाथांचे दर्शन,कोरोना नियम पाळण्याचे केले आवाहन | Dhananjay Munde In Vaijnath Temple
sakal

बोलून बातमी शोधा

परळी (जि.बीड) : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रभू वैजनाथांचे दर्शन घेतले.

मुंडेंनी घेतले वैजनाथांचे दर्शन,कोरोना नियम पाळण्याचे केले आवाहन

sakal_logo
By
प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : राज्यातील मंदिरे आज गुरुवारपासून (ता.सात) सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परळी वैजनाथ (Parli Vaijnath) येथील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे (Vaijnath Jyotirling) सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पहाटेच मंदिरात जाऊन दरवाजे उघडत सर्वप्रथम दर्शन घेतले. कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर दर्शन घेताना शारीरिक अंतर आणि मास्कचा वापर निश्चित करावा, असे आवाहन मुंडे यांनी या वेळी केले.

हेही वाचा: चिमुकल्यांचा खेळताना झाला घात, दोघा सख्खा भावांसह तिघांचा..

शहरातील काळरात्री देवी मंदिर आणि डोंगरतुकाई मंदिरातही जाऊनही त्यांनी दर्शन घेतले.

loading image
go to top