Dhangar Activist Deepak Borhade
sakal
जालना - धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी (ता. १७) जालना येथून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणासाठी जाणारे धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवले आहे. तर धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जालना शहरासह अंबड शहरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जालन्यातील बाजारपेठ कडकडीत बंद आहे.