देता की जाता, धनगर समाजाचा इशारा; भाजप सेनेच्या वचननाम्याची होळी

भाऊसाहेब चोपडे
सोमवार, 3 डिसेंबर 2018

छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी (ता. 03) शिवसेना-भाजपच्या लोकसभा निवडणुक 2014 मधील  'वचननाम्याची' धनगर समाजातर्फे होळी करण्यात आली. या वेळी देता की जाता असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला.
 

आळंद (औरंगाबाद)- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी (ता. 03) शिवसेना-भाजपच्या लोकसभा निवडणुक 2014 मधील  'वचननाम्याची' धनगर समाजातर्फे होळी करण्यात आली. या वेळी देता की जाता असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला.

धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून होणारा विलंब समाज बांधवांचा संयमाचा अंत बघणारा आहे. गत लोकसभा निवडणुकीच्या आधी युतीने धनगर आरक्षणाबाबत लिखित आश्वासन दिले; त्यानंतरही वारंवार आरक्षण देऊ असेच सांगितले. धनगर आरक्षणाबाबत वेळकाढूपणा केला आणि आता तर पुढील अधिवेशनापर्यंत हा विषय पुढे ढकलला आह. हे आता खपवून घेतले जाणार नाही असा इशारा धनगर समाज बांधकडून देण्यात आला.

यावेळी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष रामदास गायके, धनगर आरक्षण संघर्ष समिती जिल्हा उपाध्यक्ष कैलास गायके, फुलंब्री तालुकाध्यक्ष बाबासाहेब गायके, ग्रामपंचात सदस्य आजीनाथ गायके, गोपीनाथ खिल्लारे, रावसाहेब खिल्लारे, भाऊसाहेब गायके, गंपू गायके यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

Web Title: Dhangar Community Movment in Aurangabad District