esakal | धानुरीत एका रात्रीत सात घरे फोडून चोरी; लाखोंचे दागिने लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad news

धानुरीत एका रात्रीत सात घरे फोडून चोरी; लाखोंचे दागिने लंपास

sakal_logo
By
निळकंठ कांबळे

लोहारा (उस्मानाबाद): एका रात्रीत सात घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख रक्कमेसह सोने, चांदीची दागिने लंपास केले. ही घटना लोहारा तालुक्यातील धानुरी येथे सोमवारी (ता.१२) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोहारा तालुक्यातील धानुरी येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला.

चोरट्यांनी विष्णू साळुंके, इंद्रजित जाधव, भारताबाई घाटे यांच्या घराराचे दार उचकटून कपाटात ठेवलेले रोख रक्कमेसह एक लाखाचे दागिन्यांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा वळवत राम पाटील, कोंडीबा सरडे, रमेश जाधव, लहू जाधव यांचे घर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. सोमवारी सकाळी उठल्यानंतर चोरी झल्याचे लक्षात आले. चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच लोहारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक ए.एन. वाठोरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

हेही वाचा: लाल परीच्या ग्रामीण भागातील फेऱ्या वाढल्या; आंतरराज्य सेवाही सुरू

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उस्मानाबाद येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पंरतु चोरट्यांचा सुगावा लागला नाही. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. मागील काही महिन्यापासून तालुक्यात चोरीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. बहुतांश चोरीच्या घटनांचा अद्याप सुगावा लागला नसतानाच धानुरीत एकाच रात्री सात घरफोड्या झाल्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

loading image