esakal | लाल परीच्या ग्रामीण भागातील फेऱ्या वाढल्या; आंतरराज्य सेवाही सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

लाल परीच्या ग्रामीण भागातील फेऱ्या वाढल्या; आंतरराज्य सेवाही सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर (उस्मानाबाद): एसटीने ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या सुरू केलेल्या आहेत, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाने सोमवारी (ता. १२) दिली. तालुक्यातील तुळजापूर ते आरळी बुद्रूक, तुळजापूर ते निलेगाव आदींसह अनेक फेऱ्या बंद असल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. तुळजापूर आगाराने महाराष्ट्रासह आंतरराज्य एसटी सेवा सुरू केल्या आहेत. तुळजापूर ते हैदराबाद तसेच तुळजापूर ते नाशिक एसटी सुरू केलेल्या आहेत.

तुळजापूर ते वडाळा, तुळजापूर ते नळदुर्ग, तुळजापूर ते नंदगाव, तुळजापूर ते बोळेगाव आदींसह बसफेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागातील नागरिक सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन कामकाजासाठी शहरात येतात. त्यामुळे एसटीला व्यवसाय होत आहे. तुळजापूर ते बामणी तालुका उस्मानाबाद एसटी सुरू करण्यात आलेली आहे.

हेही वाचा: लातूरचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद, नियमित वेळापत्रक कोलमडणार

अजून प्रतीक्षाच
तालुक्यात पांगरधरवाडी तसेच निलेगाव आणि अन्य काही गावामध्ये एसटी सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना खासगी वाहनाने आणि दुचाकीवर प्रवास करावा लागत आहे.

ग्रामीण भागातील अनेक एसटी फेऱ्या सुरू केल्या आहेत. तुळजापूर ते निलेगाव या मार्गावर पुलाचे काम चालू होते. ते पूर्ण झाल्याचे पत्र बांधकाम खात्याकडून तुळजापूर आगारास मिळाले आहे. त्यामुळे तुळजापूर ते निलेगाव फेरी मंगळवारपासून (ता. १३) सुरू करणार आहोत. शनिवार आणि रविवार एसटीचा व्यवसाय कमी असतो. मात्र, सोमवार ते शुक्रवार एसटीस गर्दी असते.
- राजकुमार दिवटे, आगारप्रमुख, तुळजापूर.

loading image