

Dharashiv News
esakal
धाराशिव: जिल्ह्यातील ३६ हजारांच्या जवळपास लाडक्या बहिणींनी अर्जातील तांत्रिक त्रुटी आणि चुकीच्या माहितीमुळे रखडलेली ई-केवायसी प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत.
मात्र, ३६ हजारांपेक्षा अधिक अर्जांमध्ये ई- केवायसी करतेवेळी पर्याय निवडताना झालेल्या चुकीमुळे अशा महिलांची ई- केवायसी पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण झाला.