

Police Combing Operation in Khamkarwadi
Sakal
येरमाळा : बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर रोडवर मागील काही दिवसांपासून दरोडेखोरांच्या टोळ्या सक्रिय होऊन मारहाण करत लुटत असल्याच्या तक्रारी गेवराई आणि बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ताब्यात घेणे सुरु केले.सोमवार (ता.१५) यातील तीन आरोपींना धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडीत धाड टाकुन बेड्या ठोकल्या. महामार्ग दरोड्यातील चौदा लाखाचा,मुद्देमाल जप्त केला.