लोहारा (जि. धाराशिव): शेतजमिनीच्या व जुन्या वैरातून पती-पत्नीचा भरदिवसा कोयत्याने वार करून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना करजखेडा चौरस्ता (ता. धाराशिव) येथे बुधवारी (ता. १३) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.