

Maharashtra Farmer Sadiq Sayyad Uses Staggered Coriander Sowing to Earn Nine Lakh Rupees in Five Months Despite Poor Rainfall
sakal
खामसवाडी (जि. धाराशिव): प्रयोग करीत राहीले तर यश मिळू शकते हे खामसवाडी (ता. कळंब) येथील सादीक सय्यद या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्या शेतातील काही भाग कोथिंबिरीसाठी राखीव ठेवला. आलटून पालटून पेरणी केली. सुरवातीला या पिकाने योग्य दराअभावी दगा दिला पण नंतरच्या पेरण्यांना त्यांना तारले. सध्याच्या अडीच एकरमधील कोथिंबिरीला व्यापाऱ्याने पाच लाखांची बोली केली आहे, असे सय्यद यांनी सांगितले.