

Dharashiv News
esakal
धाराशिव: विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील विविध भागांत मंगळवारी (ता. २१) सायंकाळनंतर अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. रब्बी हंगामातील काही पिके, फळपिकांना या पावसाचा फटका बसला.
तापमानाचा पारा वाढत असताना दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. आज धाराशिव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.