Tanaji Savant signals independent local Swaraj election in Dharashiv
sakal
मराठवाडा
Dharashiv Elections : धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीत फुट; स्थानिक स्वराज संस्था स्वबळावर लढण्याचे माजी आरोग्य मंत्री सावंत यांचे संकेत!
Local Elections : विकास कामांचा उल्लेख, २ हजार कोटींच्या निधीमुळे तालुक्यातील प्रकल्पांचे यश आणि नदी खोलीकरणाचे महत्त्व अधोरेखित.
धनंजय शेटे
भूम : जो महाराष्ट्रातील सत्ता उलटून टाकतो ? उलटू शकतो ? असा सहकारी तुमचा असताना २०२४ मध्ये महाराष्ट्रातील २८८ पैकी आपल्या मतदारसंघात दोन हजार कोटीचा निधी आणलेला असताना हे जनतेपर्यंत पोहोचू का शकलो नाही .असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात संवाद बैठकीत बोलताना केले आहे . यावेळी दत्तांआणा साळुंके ,संजय गाढवे ,संयोगिता गाढवे ,अण्णासाहेब देशमुख ,बाळासाहेब पाटील ,बालाजी गुंजाळ,विशाल ढगे ,युवराज हुंबे ,विशाल ढगे ,अर्चना दराडे ,प्रवीण देशमुख ,निलेश चव्हाण ,ज्ञानेश्वर गीते ,रामकिसन गव्हाणे ,यांच्या सहपदाधिकारी उपस्थित होते .

