

Dharashiv Tremors
esakal
धाराशिव: जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी (ता. आठ) सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी भूगर्भातून मोठा आणि गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. अचानक झालेल्या आवाजामुळे तुळजापूर आणि लोहारा तालुक्यांतील अनेक गावांमधील घरांच्या खिडक्यांची तावदाने मोठ्या प्रमाणावर थरथरली. काही सेकंद जमीन हादरल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, भूकंप झाल्याची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नाही, असे लोहाराचे तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी सांगितले.