Dharashiv News: पेट्रोल-डिझेल पुरवठा सध्या तरी ‘ओके’; कुठेही रांगा नाहीत, ‘त्या’ खातेदारांनाही उधारीवर इंधन

Fuel Supply Status in Dharashiv: धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत, कुठेही रांगा नाहीत. शासकीय व नियमित खातेदारांना उधारीवर इंधन पुरवठा सुरू.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: जिल्हाभरातील पेट्रोल पंपचालकांना आता तेल कंपन्यांकडून रोख रक्कम भरून इंधन साठा मागवावा लागत असला, तरी जिल्ह्यात इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. शहरातील प्रमुख पेट्रोल पंपांवर गुरुवारी (ता. २६) कोठेही रांगा दिसून आल्या नाहीत. विशेष म्हणजे, पंपचालकांना स्वतः रोखीने व्यवहार करावा लागत असला, तरी त्यांनी आपल्या नियमित उधारीवरील ग्राहकांना (शासकीय कार्यालये, रुग्णालये) उधारीवर इंधन देणे सुरूच ठेवल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com