

Dharashiv district police launch special awareness campaign to curb digital fraud.
Sakal
कळंब : मोबाईलवर येणारा अनोळखी फोन, व्हाट्सअँप वरील व्हिडिओ कॉल, सोशल मीडियावरील Friend Request किंवा आमिष दाखवणारी लिंक.. क्षणभराच्या निष्काळजीपणामुळे खात्यातील पैसे गायब होऊ शकतात.सायबर गुन्ह्यांचे वाढते धोके लक्षात घेऊन धाराशिव जिल्हा पोलीस दलातर्फे ऑक्टोबर २०२६ हा ‘सायबर जनजागृती मास’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. नागरिकांनी ऑनलाइन जगात विश्वास ठेवण्यापेक्षा सतर्क राहण्याची गरज आहे, असे आवाहन पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी केले आहे.