

Rapid Expansion of Wind Power Projects in Dharashiv
Sakal
येरमाळा : धाराशिव जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये पवनचक्की विद्युत प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले जात असून नवीकरणीय ऊर्जेच्या माध्यमातून राज्याच्या वीज निर्मितीत मोलाची भर पडत आहे.पर्यावरणपूरक वीज निर्मितीमुळे हा प्रकल्प विकासाचे प्रतीक मानला जात असला तरी,प्रत्यक्षात स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळणार का आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात योग्य मोबदला मिळाला का,जमिनी करार होऊनही शेतकऱ्यांच्या अतिरिक्त मावेज्यासाठी विरोध, प्रकल्प कंत्राटदारांना खंडणी बहाद्दारांचा त्रास असे अनेक प्रश्न ऐरणीवर आले असुन स्थानिक लोकप्रतिनिधिंनी या प्रकल्पातून शेतकरी,सुशिक्षित बेकरांना दिशा देण्याची सोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वाशी सारखी होणारी आंदोलने यासह कडकनाथवाडी प्रकल्पाच्या वाहने जाळून आठ कोटी चे नुकसान प्रकल्पाला सुरक्षितता देण्याची गरज निर्माण झाली आहे.