Dharashiv Fire : धाराशिवमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव! घराला लागलेल्या आगीत ६ जणांचा गुदमरून मृत्यू; एकजण बचावला

Yedshi Fire Accident : धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे मध्यरात्री एका घराला भीषण आग लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला. संबंधित कुटुंब किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत होते आणि आग अचानक लागली.
Dharashiv Yedshi Fire: Six Family Members Die in Midnight Blaze

Dharashiv Yedshi Fire: Six Family Members Die in Midnight Blaze

esakal

Updated on: 

धाराशिव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धाराशिवमधील येडशी येथे एका घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकजण बचावल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक घराला आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे धुरामुळे गुदमरून सहा जणांचा मृत्यू झाला.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...