

Dharashiv youth–woman dispute leads to serious incident
Sakal
येरमाळा : दीपक बारकुल कळंब तालुक्यातील चोराखळी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आळणी फाटा साई कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून आणि त्यानंतर झालेल्या वादातून एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अश्रुबा अंकुश कांबळे (वय २५) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, येरमाळा पोलीसांनी महिलेवर गुन्हा नोंद करुन ताब्यात घेतले आहे.