

Dharur Gold Fraud Case Jeweller Loses 17.50 Lakh in Fake Gold Exchange Deal Police Register Case Against Three Unknown Accused
esakal
किल्लेधारूर : धारूर शहरातील सराफा व्यापाऱ्याची सोन्याच्या मोडीच्या व्यवहारातून तब्बल १८ लाख १५ हजार ४०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. चांदीवर सोन्याचा मुलामा दिलेली मोड सोन्याची असल्याचे भासवून १७ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले, तर यापूर्वी उधारीवर घेतलेल्या चांदीच्या दागिन्यांचे ६५ हजार ४०० रुपयेही बुडवण्यात आले. या प्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध धारूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.