Dhule-Solapur Highway Protest: धुळे-सोलापूर महामार्गावरील अपूर्ण पुलकाम, खड्डे व अपघातप्रवण ठिकाणांवर उपाययोजनेसाठी कन्नडजवळ रस्ता रोको आंदोलन

धुळे-सोलापूर महामार्गावरील पुल, बोगदा व उड्डाणपुलांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी कन्नडजवळ रस्ता संघर्ष समितीचा रस्ता रोको; अपघातप्रवण ठिकाणांवरील खड्डे व संरक्षण कठडे दुरुस्तीची जोरदार मागणी
Highway Protest in Kannad: Rasta Roko Demanding Completion of Dhule-Solapur Highway Works

Highway Protest in Kannad: Rasta Roko Demanding Completion of Dhule-Solapur Highway Works

Sakal

Updated on: 

कन्नड: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच खड्डे व अपघातप्रवण ठिकाणांच्या समस्यांवर उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग ५२ व औरंगाबाद-चाळीसगाव नियोजित रेल्वेमार्ग संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी (ता. २९) कन्नडजवळ महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा स्वाती कोल्हे व समितीचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com