hyva truck
hyva trucksakal

National Highway : धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर बेदरकार हायवा ट्रक ठरतेय यमदुत

अनेक अपघातास विनानंबर हायवा कारणीभुत, महसुल व पोलीसांचे दुर्लक्ष

आडुळ - गेल्या काही दिवसांपासुन धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील झाल्टा फाटा ते पाचोड दरम्यान झालेल्या विविध अपघातास वाळु, मुरुम व खडीची वाहतुक करणारे बेदरकार हायवा ट्रक कारणीभुत ठरत असल्याचे प्रमाण वाढले असुन, अवघ्या चार महिन्यात म्हणजे २०२४ च्या जानेवारी ते एप्रिल दरम्यान विविध ठिकाणी झालेल्या अपघातात भहधाव हायवांनी १० निरापराध दुचाकी, चार व पादचारी यांचे बळी घेवुन त्यांच्यासाठी यमदुत ठरले आहेत.

तर १५ च्यावर अपघातातील जखमी झालेल्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. विशेष म्हणजे अपघाताऩतर यातील एक ही हायवा चालक घटनास्थळी न थांबता घटनास्थळावरुन पसार झाले. त्यात महामार्गावर सद्यस्थितीला चालत असलेल्या एका ही हायवा वाहनावर नंबर प्लेट राहात नसल्याने कोणी जर अपघात होतांना बघितले तरी त्यावर नंबर नसल्याने नेमक्या कोणत्या हायवाने उडविले हे अपघात बघणाऱ्याला सांगता येत नसल्याने हायवा चालकांचा महामार्गावर आतंग वाढला आहे.

शहागड, विहामंडवा, पैठण, नांदर, दावरवाडी, घारेगाव, सांजखेडा नदी पाञातुन अवैध वाळु वाहतुन व ठिकठिकाणी सुरु असलेल्या भरतीच्या कामासाठी मुरुम तर बांधकामासाठी खडी ने भरलेले शैकडो हायवा ट्रक दररोज राञंदिवस धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील विनानंबर प्लेट भरधाव वेगाने ताशी १२० ते १६० च्या स्पिडने धावतात. त्यामुळे या महामार्गावर हायवाच्या धडकेने होणाऱ्या अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

या हायवा बेदरकार स्पिडने महामार्गाने धावत असल्याने इतर वाहन चालकांना जिवमुठीत घेवुन चालावे लागते आहे. हायवा चालकांना ट्रिप प्रमाणे पगार मिळत असल्याने ते दिवसातुन जेवढ्या जास्त खेपा होतील तेवढे जास्त पगार मिळेल या आशेने अतिवेगाने हायवा चालवितात त्यामुळे अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे हि हायवा वाहने विना नंबर प्लेट ची व महामार्गाने ताशी १०० किलो मिटर वेगाच्या नियमाचे सर्रासपणे उलंघन करीत छञपती संभाजीनगर, चिकलठाणा, करमाड, पाचोड, एमआयडिसी चिकलठाणा, गोंदी, पैठण पोलीसांसह महामार्ग पोलीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतुक पोलीस यांचे दुर्लक्ष होत आहे तर महसुल विभाग अवैध वाळु व मुरुमाच्या उपशाकडे वाळु माफीयांशी अर्थपुर्ण संबध ठेवुन जाणीवपुर्वक कानाडोळा करीत असल्याचे चिञ महामार्गावर पहावयास मिळते आहे.

महामार्गावर धावणारे हे हायवा वाहन नसुन यमदुत आहेत जी समोरील वाहनांना उडवुन खुलेआम समोरील वाहन धारकाचा एक प्रकारे खुनच करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. पोलीस दुचाकी व चार चाकी वाहन धारकांना जागोजागी थांबवुन त्यांच्याकडुन दंड वसुल करते माञ या वाळु माफियांच्या दहशतीमुळे त्यांच्यावर कोणतीच कारवाई करीत नाही.

- जाहेर शेख, (उपसरपंच, आडुळ)

महामार्गावर धावत असलेल्या विना नंबर प्लेट व भरधाव हायवा वाहनांवर कारवाई पाचोड पोलीस कडक कारवाई करणार असुन प्रादेशिक परिवहन विभागाला अशा सर्व वाहनांवर दंडात्मत कारवाई करावी, असे पञ पाठविण्यात येणार आहे.

- शरदचंद्र रोडगे (सहायक पोलीस निरिक्षक, पाचोड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com