Diesel : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात घरपोच मिळतं डिझेल; वाहनचालक व्यक्त करतायत समाधान | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diesel

Diesel : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात घरपोच मिळतं डिझेल; वाहनचालक व्यक्त करतायत समाधान

केदारखेडा : डिझेल पंपाधारकांकडून घरपोच डिझेल दिले जात असल्याने वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे. व्यवसाय कुठला ही असो, या स्पर्धेच्या युगात नफा कमी, विक्री जादा त्यामुळे ग्राहक वाढल्यामुळे व्यवसाय धारक हा बाजारपेठेत तग धरतोय.

पेट्रोलपंप चालकांमध्ये पेट्रोलपंपाच्या दरात घरपोच डिझेल मिळत असल्याने वाहनधारकांना पेट्रोलपंपावर जाण्यासाठी होणारा खर्च टळत आहे. त्यातच त्यांचा वेळ ही वाचत असल्यामुळे वाहनधारक जागेवरच डिझेल खरेदी करत असल्याचे प्रमाण वाढले आहे.

सध्या वाहनधारकांना पंपावरूण डिझेल आणायचे ठरवले तरी एक रूपया किमी पडतोय. त्यातच तीस पस्तीस लिटर कँन साठी मोटारसायकलवर रिस्क व दोघे बेजार होतात. त्यामुळे घरपोच मिळणारे डिझेल फायदेशिर ठरत आहे.

- कृष्णा नागरे (ट्रॅक्टर वाहनधारक):

घरपोच मिळणारे डिझेल हे खुप फायदेशीर असून यात पंप चालकांनी नियोजन करून प्रत्येक गावाला वेळेचे टायमिंग दिले तर यात पुन्हा वाहनधारकांचा फायदा होईल. तसेच पंपचालकांच्या वाहनाचा वेळ वाचेल व गावात दिलेल्या टायमिंगवरच ग्राहक हजर होऊन डिझेल खरेदी करेल.

- सोपान ठोंबरे (वाहनधारक)

दरम्यान अशा पद्धतीने पेट्रोल घरपोच देणे कायदेशी योग्य की अयोग्य याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही.

टॅग्स :petrol