Parbhani : टॅंकर रस्त्यावर पलटी, अनेकांची डिझेल भरण्यासाठी पळापळ

पूर्णा रेल्वे जंक्शनसाठी जाताना दुर्घटना
Parbhani Accident
Parbhani Accidentesakal

ताडकळस (जि.औरंगाबाद) : पूर्णा (Purna) तालुक्यातील फुलकळस शिवारात रिलायन्स कंपनीचे टॅंकर (एमएच १२ एसई ७५०३) मुंबई रेल्वेसाठी पूर्णा जंक्शन येथे जात असताना शुक्रवारी (ता.१८) सकाळी सातच्या दरम्यान पलटी झाल्याची घटना घडली. घटनास्थळी ताडकळस पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड हे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी भेट देऊन तात्काळ अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी पाचारण केले. घटनास्थळी असंख्य लोकांचा जमाव झाला होता. पलटी झालेल्या टँकरमधून सांडलेले डिझेल कोणी टाकी, तर कोणी घागरी, बादल्या घेऊन डिझेल भरण्यासाठी आले व भरूनही नेले. (Diesel Tanker Accident In Parbhani)

Parbhani Accident
मजबूत मोदी सरकारकडून भ्रष्टाचारावर मजबूत कारवाईची अपेक्षा - वरुण गांधी

घटनास्थळी अनुचित प्रकार दुर्घटना कुठलीही घडलेली नाही. सहायक पोलिस निरीक्षक रामोड यांच्या निर्देशानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी खाली जमिनीवर सांडलेले डिझेलमध्ये पाणी मिसळून टाकले. टँकरचालकच्या म्हणण्यानुसार कोणीतरी दगड फेकून मारीत होते म्हणून टँकर पलटी झाला आहे.(Parbhani)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com