कागदपत्रांसाठी ‘डिजी लॉकर’

अनिल जमधडे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

औरंगाबाद - ‘डिजी लॉकर’ अर्थात कागदपत्रांची ‘बॅंक’ नव्याने विकसित झाली आहे. डिजी लॉकरमध्ये तुमच्या वाहन परवान्यासह सर्वच महत्त्वाची कागदपत्रे मोबाईलवर सेव्ह करून ठेवण्याची सोय आहे. वाहन पकडल्यांनतर अगदी मोबाईल कॉपी (वाहन परवाना) दाखवून सुटका करून घेण्याची सोय यानिमित्ताने झाली आहे. 

केंद्र शासनाने डिजी लॉकर (Digi Locker) ही नवीन संकल्पना कार्यान्वित केली आहे. त्यामुळे कुठल्याही शासकीय कागदपत्रांची डिजीटल कॉपी डिजी लॉकरमध्ये ठेवता येते. आधार क्रमांकाशी डिजी लॉकरबरोबर जोडून कागदपत्रे जतन करून ठेवण्याची ही सोय आहे. 

दोन वर्षांपासून प्रयत्न
डिजी लॉकरसंदर्भात सर्वप्रथम ७ सप्टेंबर २०१६ रोजी रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रसिद्धिपत्रक काढले होते.

त्यानंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाने ८ फेब्रुवारी २०१७ रोजी अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनंतर १९ ऑगस्ट २०१८ रोजी राज्याच्या परिवहन आयुक्तांनी परिपत्रक काढले.

डिजी लॉकर हा मोबाईल ॲप प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. आधार कार्डच्या क्रमांकाने जोडलेले असल्याने सर्वच कागदपत्रे यात घेता येणार आहेत.

याची आहे उपलब्धता 
डिजी लॉकरमध्ये प्रामुख्याने मोटार वाहन परवाना, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, परवाना (परमिट) यामध्ये उपलब्ध आहे. आधार कार्ड, पॅनकार्ड, टॅक्‍स प्रमाणपत्र, विविध इन्शुरन्स प्रमाणपत्र, देशभरातील विविध विद्यापीठे, तांत्रिक संस्था, दहावी-बारावीचे बोर्ड यांची यादीच यामध्ये उपलब्ध आहे. ही सर्व प्रमाणपत्रे डिजी लॉकरस्वाक्षरित असल्याने पुन्हा साक्षांकन करण्याची गरज नाही किंवा त्यावर शंकाही घेता येणार नाही. याशिवाय जी प्रमाणपत्रे ऑनलाइन नाहीत ती डिजीटल स्वाक्षरीसह आपण अपलोड करून ठेवू शकतो. 

शंका नकोच 
डिजी लॉकरमध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स फॉर्ममध्ये कागदपत्रे उपलब्ध असल्यास त्याची पुस्तकी स्वरूपात पुन्हा मागणी करू नये, अशी अधिसूचना आहे. एखाद्या प्रकरणात पोलिसांना परवाना जप्त करावयाचा असल्यास त्याची नोंद ई-चलनच्या माध्यमातून परिवहन विभागाच्या ‘सारथी’ प्रणालीत घेता येईल. त्यामुळे प्रत्यक्षात फिजिकल स्वरूपात कागदपत्रे जप्त करण्याची गरजच नाही, असे परिवहन विभागाने परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे. 

Web Title: Digi Locker for Documents