डिजिटल थिंकिंगवर आज ‘यिनटॉक’

YinTalk
YinTalk

औरंगाबाद - ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे (यिन) ‘यिनफेस्ट’च्या माध्यमातून ‘यिनटॉक’ कार्यक्रमात ‘डिजिटल प्रवास’ या विषयावर तरुणांशी संवाद साधला जाणार आहे. औरंगाबादमध्ये येत्या बुधवारी (ता. चार) सकाळी अकरा वाजता ‘एमजीएम’च्या आर्यभट्ट सभागृहात हा कार्यक्रम होईल. त्यात नागपूर येथील पोलिस उपायुक्‍त हर्ष पोद्दार, अभिनेत्री राजश्री देशपांडे, यूथ फॉर पीपलचे सहसंस्थापक दीपेश टांक तरुणांशी संवाद साधतील.

संगीत, चित्रकला, गप्पा व वैविध्यपूर्ण कलागुणांचा आविष्कार असलेल्या यिनफेस्ट नगरसह नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबादेतही होत आहे. डिजिटल प्रवास या विषयावर यिनटॉक शोमध्ये गप्पा रंगतील. राज्यभरात होणाऱ्या गप्पांमध्ये डिजिटल क्षेत्रातील विविध पैलू उलगडणार आहेत. डिजिटल क्षेत्रातील यशस्वी व्यक्‍ती विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. नव्या कल्पना ही प्रत्येकाची गरज आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांतील व्यवस्थापकांपासून ते उद्योजक अन्‌ प्राथमिक शाळांमधील शिक्षकांपर्यंत प्रत्येकाला उपलब्ध साधनसामग्रीचा वापर अधिक चांगला करायला शिकणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रत्येकाला डिजिटल विचारांची गरज आहे. याचदृष्टीने संवादाचा हा कार्यक्रम तरुणाईसाठी प्रेरक ठरेल. 

या कार्यक्रमात आयपीएस अधिकारी हर्ष पोद्दार हे सायबर क्षेत्रातील गुन्हेगारी विषयावर माहिती देणार आहेत. ते ऑक्‍स्फर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. अफवा आणि बनावट बातम्यांविरोधात लढणारे पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्र पोलिस युवा संसद हा प्रकल्प त्यांनीच राबविला. राजश्री देशपांडे या अभिनेत्री म्हणून डिजिटल क्षेत्रातील प्रवास उलगडणार आहेत. जेम्स वॉटकिन्स दिग्दर्शित बीबीसी वनच्या मॅकमाफियापासून त्यांनी पदार्पण केले. अनुराग कश्‍यप दिग्दर्शित ओरिजनल सेक्रेड गेम्स्‌मध्येही त्या दिसणार आहे. ‘नभांगण फाउंडेशन’च्या माध्यमातून खेड्यांच्या शाश्‍वत विकासासाठी प्रयत्न करीत आहेत. दीपेश टांक हे बदल घडणाऱ्या सामाजिक चळवळींचा डिजिटल क्षेत्रातील प्रवासावर बोलणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी आकाश गायकवाड (मो. ८७८८०६०००५) यांच्याशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com