Ashadi Wari 2025: हजारो भाविकांच्या हजेरीत नारायणगडाची दिंडी पंढरीकडे
Pandharpur Yatra : श्रीक्षेत्र नारायणगड येथून पंढरपूर वारीसाठी दिंडीचे प्रस्थान झाले, यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. वारंवार १९२३ पासून सुरू असलेली परंपरा यावर्षीही अखंडपणे पुढे जात आहे.
बीड : ‘धाकटी पंढरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगड येथून दिंडीचे बुधवारी (ता. २५) पंढरपूर वारीसाठी प्रस्थान झाले. दिंडीला निरोप देण्यासाठी गडावर हजारो भाविकांची मांदियाळी जमली होती.