गुरुकुल संचालक मेटाकुटीला !

file photo
file photo
Updated on

परभणी : एकीकडे नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याची शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तयारी सुरू झालेली असून शासनाकडून गुरुकुल, निवासी वसतिगृहे सुरू करण्याची कुठलीही परवानगी नसल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील गुरुकुल संचालक मेटाकुटीला आले आहे. थकलेले शुल्क, सुरू असलेले इमारत भाडे व कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवतांना ते त्रस्त झाले आहेत. अनेकांनी आपली गुरुकुले बंददेखील केली आहेत.
शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा वर्षांत गुरुकुल, निवासी वसतिगृहे संस्कृती चांगलीच फोफावली असून शहरासह जिल्ह्यातील दोन हजारांपेक्षा अधिक गुरुकुलांतून जिल्ह्यासह राज्यातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मार्च-एप्रिल महिना म्हणजे गुरुकुलांच्या वसुलीचे महिने. परंतु, मार्चमध्ये अचानकच लॉकडाउन लागल्यामुळे गुरुकुलेदेखील तत्काळ ओस पडली व येणारे विद्यार्थ्यांचे शुल्कदेखील थकले. किमान जून महिन्यात तरी निमयित शाळा, महाविद्यालये सुरू होतील, विद्यार्थी परत येतील व सोबतच शुल्कही मिळेल, या आशेवर बहुतांश गुरुकुल संचालकांनी हजारो रुपये देऊन किरायाने घेतलेल्या इमारती कायम ठेवल्या. परंतु, कोरोनाचा कहर त्यांचा पिच्छा सोडावयास तयार नसून एकीकडे शाळा सुरू होण्याची तयारी होत असताना त्यांच्याबाबत मात्र कुठलाही निर्णय होत नसल्यामुळे गुरुकुल सुरू करण्याची परवानगी मिळत नसल्यामुळे ते त्रस्त झालेले आहे.


नियम पाळून सुरू करण्याची मागणी
डी. एड, बी. एड, एम. एड झालेले परंतु, सुशिक्षीत बेरोजगार असलेल्या बहुतांश युवक या व्यवसायाकडे वळले होते. तर काहीजण व्यवसाय म्हणून या क्षेत्रात उतरले होते. जे घरून सधन आहेत, शेतीबाडी आहे, ते हा तोटा सहन करून शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा करीत आहेत, तर ज्यांचा उदरनिर्वाहच त्यावर होता, त्यांचे मात्र मोठे हाल होतांना दिसून येत आहेत. अनेकांनी भाड्याने घेतलेल्या इमारती सोडल्या, अनेकजण गावाकडे पोचले, तर काहींसह ज्यांना स्वतःच्या इमारती आहेत ते मात्र शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा करीत आहेत. नुकतीच या गुरुकुल संचालकांची एक बैठक झाली. त्यामध्ये एकमेकांना धीर देण्यासोबतच मदत करण्याचेदेखील ठरले. सर्व प्रकारचे नियम पाळून गुरुकुल सुरू करण्यासाठी ते जिल्हा प्रशासनाकडे मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : मुसळधार पावसाचा पूलाला फटका, संपर्क तुटला, कुठे ते वाचा...


पालकांपुढेही पाल्यांना ठेवण्याचा प्रश्न
या गुरुकुलांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणारी ही गुरुकुले असून शिक्षणाची सोय नसल्यामुळे मोठ्या आशेने व अपेक्षेने पालकांनी आपल्या पाल्यांना या गुरुकुलांत ठेवलेले आहेत. शाळा सुरू होणार परंतु गुरुकुले नाहीत, तर आपल्या पाल्यांना कुठे ठेवणार, असा प्रश्न पालकांपुढेदेखील आहे. ज्यांनी सोय आहे ते खोल्या घेऊन राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, ज्यांची व्यवस्था होणे शक्य नाही अशांच्या मनात मात्र आपला पाल्य शिक्षणापासून वंचित राहणार तर नाही ना, अशी भीतीदेखील निर्माण झाल्याचे दिसून येते.

परवानगी देण्याची विनंती करणार
गुरुकुल संचालक सुशिक्षित बेरोजगार असून त्यांची समस्या गहन झाली आहे. नुकतीच या संदर्भात बैठक झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरेक्षेला प्राधान्य देण्याचे निश्चित झाले. सोमवारी (ता. २९) जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन समस्या सांगणार असून परवानगी देण्याची विनंती करणार आहोत.
के. पी. कनके
अध्यक्ष,
गुरुकुल संघटना, परभणी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com