
वडवणी : तालुक्यातील पुसरा येथील रहिवाशी असलेले प्रदीप मुजमुले हे दोन्ही पायाने अपंग आहेत. मात्र, गेल्या १४ वर्षांपासून विठ्ठलभक्तीच्या बळावर ते न चुकता आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात. विठुराया आपल्याला जगण्यासाठी उर्जा देत असल्याची भावना प्रदीप व्यक्त करतात.