esakal | गुरूच्या विरहाने शिष्यानेही सोडला श्वास, विलास शेटे यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

विलास विठ्ठलअप्पा शेटे

गुरूच्या विरहाने शिष्यानेही सोडला श्वास, विलास शेटे यांचे निधन

sakal_logo
By
कमलेश जाब्रस

माजलगाव (जि.बीड) : येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती तपोरत्न प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी माजलगावकर (Shivacharya Mahaswami Majalgaonkar Maharaj) यांचे मागील पंधरा वर्षांपासुन अविरतपणे सेवेकरी व मठाचे निःस्वार्थ सेवक असणारे विलास विठ्ठलअप्पा शेटे (वय 45) यांनी गुरूंच्या विरहाने प्राण सोडला. माजलगांवकर महाराजांचा समाधी सोहळा उरकल्यानंतर काही वेळातच समाधिस्थळी शनिवारी (ता.11) हृदयविकाराच्या त्रासाने मृत्यु झाला. माजलगाव (Majalgaon) मठाचे मठाधिपती तपोरत्न प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महाराज शुक्रवारी (ता.10) शिवचरणी लीन झाले. त्यांचा समाधी सोहळा मठामध्ये शनिवारी (Beed) सकाळी करण्यात आला.

हेही वाचा: गेवराई तालुक्यात तलावाला पाडले भगदाड, ग्रामस्थ संतापले

यानंतर विलास शेटे यांना छातीत त्रास होत असल्याने तात्काळ त्यांना देशपांडे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु त्यांना डॉक्टारांनी मृत घोषित केले. मागील पंधरा वर्षांपासुन विलास शेटे कुठल्याही अपेक्षेविना निःस्वार्थ भावनेने माजलगाव मठाची सेवा करत. त्यांची काम करण्याची हातोटी व विलक्षण चपळता माजलगावकर महाराजांना भावल्याने अगदी कमी वेळेत ते विश्वासू सेवेकरी म्हणुन परिचित झाले होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने विरशैव समाजाला दोन दिवसात हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.

loading image
go to top