esakal | पाडवा सणावर संचारबंदीचे विरजन 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

कोरोना आणि संचारबंदीमुळे पाडवा सणाच्या उत्साहावर विरजन पडले आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता. २४) पहाटेपासून लागू झालेली संचारबंदीची योग्य अंमलबजावणी होत असली तरी शिथिलतेच्या काळात नागरिकांना गर्दीचा मोह आवरता येत नसल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.

पाडवा सणावर संचारबंदीचे विरजन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २४) पहाटेपासून लागू झालेली संचारबंदीची योग्य अंमलबजावणी होत असली तरी शिथिलतेच्या काळात नागरिकांना गर्दीचा मोह आवरता येत नसल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. बाजारांमध्ये मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, कोरोना आणि संचारबंदीमुळे पाडवा सणाच्या उत्साहावर विरजन पडले आहे. 

मंगळवारी पहाटेपासून संचारबंदी लागू झाली. या काळात जिल्ह्याच्या सिमांवरुन येण्या-जाण्यावर निर्बंधासह सार्वजनिक ठिकाणी गर्दीवरही निर्बंध होते. कार्यालयांतही शुकशुकाट दिसून आला. बुधवारी (ता. २५ ) पाडवा सणाचा उत्साह कोरोना आणि संचारबंदीमुळे मावळून गेला.

हेही वाचा - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश

दरम्यान, शिथिलतेच्या काळात गर्दीचा मोह नागरिकांनाच टाळता आला नसल्याचे चित्र होते. संचारबंदीच्या काळात बाहेर पडलेल्या दुचाकीस्वरांना पोलिसांकडून दंडुक्याचाही प्रसाद खावा लागला. दरम्यान, दुकाने व पानटपऱ्या बंद आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी सोमवारी (ता. २३) जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत १३ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले. 

loading image