ऊसावरच चाय पे चर्चा, यंदा होणार का ऊसाचे सोने?

वैभव पाटील
Sunday, 1 November 2020

यंदा शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जाण्यास सर्वच कारखाने सरसावल्याने, सध्या नायगाव परिसरात उसावरच 'चाय पे चर्चा' सुरू आहे.

नायगाव (जि.उस्मानाबाद) : यंदा शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जाण्यास सर्वच कारखाने सरसावल्याने, सध्या नायगाव परिसरात उसावरच 'चाय पे चर्चा' सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचे यंदा सोने होणार अशी हे मात्र निश्चित आहे. नायगावसह पाडोळी, बोरगाव, पिंपरी (शि) रायगव्हाण, जायफळ, येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रांजनीचा नँचरल शुगर (ता.कळंब) हा वरदान ठरत होता.

कांद्याच्या रोपांना रोगांची लागण; बियाणांचा दर वाढतोय, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

पण शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत लातूर जिल्ह्यातील मळवटी येथील २१ शुगरने या भागातील शेतकऱ्यांना शेअर्स उपलब्ध करून दिले आहेत, तर विलास सहकारी साखर कारखाना निवळी (ता.जि.लातुर) यांनी कळंब तालुक्यातील कही अंतरावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत पाच वर्षांचा करार केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचे यंदा सोने होणार असल्याचे बोलले जात आहे. गत वर्षी परतीच्या पावसाने नायगावसह परिसरात धुमाकुळ घातला होता. पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली. त्याच ऊसासाठी या वर्षीचा पाऊस लाभदायक ठरल्याने ऊस एकदम जोमदार आला आहे. गतवर्षी पाण्याअभावी उसाचे क्षेत्र घटले होते. त्यामुळे काही कारखाने गळीत हंगाम सुरु करु शकले नव्हते. या वर्षी देखील इतर ठिकणी ऊस कमी असलेले ऊसाचे क्षेत्र कारखान्यासाठी डोकेदुखी ठरु शकते. त्यामुळे परिसरातील ऊसासाठी कारखाने आग्रही आहेत.

अडला शेतकरी..व्यापाऱ्यांचे पाय धरी! 

तर शेतकरी द्विधा मनस्थितीत
कधी नव्हे ते परिसरात तीन कारखाने उसासाठी आग्रही असल्याने ऊस कुठे द्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. उसाची मागणी करणाऱ्या कारखान्यांना शेतकरी तुमचा दर किती हा प्रश्न विचारत आहेत. कारखान्याचे धुराडे पेटले अन् लातुर येथील कारखान्याने एंट्री केल्याने यंदा उसाचे सोनं तर होणार मग ज्याचा दर जास्त त्यालाच ऊस द्यायचा अशी चाय पे चर्चा होत आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion On Chai Pe Charcha, Is This Year Good Price For Sugarcane?