
सीसीआयच्या खरेदी केंद्राअभावी लूट, शेतकऱ्यांना पैशांची चणचण
गंगापूर (औरंगाबाद) : दिवाळीची चाहुल लागली असली तरी, यंदा तालुक्यातील शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. कपाशी घरातच पडून असल्याने त्यांना पैशांचीही चणचण आहे. ही कपाशी शासन खरेदी कधी करेल, या विवंचनेत सध्या शेतकरी आहेत. सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र अजूनही सुरु झाले नसल्याने नाराजी आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
परतीच्या पावसाने बहरलेल्या कपाशीला नख लावल्याने उत्पन्नात ७० टक्के घट येण्याची स्थिती आहे. कोरोनामुळे लागवड व मजुरीचाही खर्च फुगला आहे. ४२०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटलने खासगी व्यापारी कापूस खरेदी करीत असून अडला शेतकरी...व्यापाऱ्यांचे पाय धरी..' अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
कपाशीचा एकरी लागवडीचा खर्चही यंदा वाढला आहे. मजुरीचे दरही भरमसाठ वाढले आहेत. थेट मध्यप्रदेशातून मजूर आणावे लागत आहे. उत्पन्न खर्चात वाढ आणि मजुरांची टंचाई अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासकीय कपाशी खरेदी केद्र सुरु होण्याची मोठी प्रतिक्षा आहे. दिवाळीच्या अगोदर एक वेचणी होते, त्यानंतरही दुसरी वेचणी केली जाते. यावर्षी दुसऱ्या वेचणीची शक्यता धुसर असल्याने आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या हाती पैसा नसल्याने व्यापारऱ्यांकडून कमी दर देऊन कपाशी खरेदी केली जात आहे. दोन दिवसांत कापूस खरेदी केंद्र सुरू न केल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल.
- संतोष जाधव, माजी सभापती, बांधकाम विभाग
(संपादन-प्रताप अवचार)