Crime
sakal
हिंगोली - वसमत तालुक्यातील चोंढी येथे पेट्रोलपंप सील करून ताब्यात घेण्यासाठी आलेल्या इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि पेट्रोलपंप चालकाच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाल्यानंतर कंपनीच्या विक्री विभागातील व्यवस्थापकाचा खंजरने वार करून खून करण्यात आला. मंगळवारी (6 ऑक्टोबर) दुपारी साडेचारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. महेश शेळके असे मृत व्यवस्थापकाचे नाव आहे. त्यांच्यावर खंजरने तब्बल 7 वार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेनंतर संशयित आरोपी उमेश पांडववीर याने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे.