Jalna News : शेतीच्या वादातून सखा भाऊ व पुतण्याने कपाशी उपटण्याच्या चिमट्याने गंभीर जखमी करून केला खून

Rural Violence : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पांगरखेडा गावात शेतीच्या वादातून कपाशीच्या चिमट्याने हल्ला करून वृद्धास गंभीर जखमी करण्यात आले.
Jalna News
Jalna NewsSakal
Updated on

अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील पांगरखेडा येथे यातील फिर्यादी यांच्या घरासमोरील हापंपाजवळ शनिवारी (ता.12) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास यातील संशियत हे एकाच भावकीतील असुन यातील संशियतानी संगमत करुण मागील भांडण व शेतीच्या वादातून फिर्यादीचे वडिल डिगंबर श्रीरंग लांडे (वय 60) वर्षे यांना कपाशी उपटण्याच्या चिमट्याने डोक्यात, पोटात व डाव्या हाताच्या कोपऱ्यावर मारून सख्या भावाने व दोन पुतण्याने यातील एक अल्पवयीन पुतण्या व एक महिला यांनी गंभीर जखमी केले. यातील साक्षीदार यांना शिवीगाळ करुण चापट, बुक्यानी व लाकडी काठीने मारून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. गंभीर जखमी अवस्थेत नातेवाईकांनी रात्री थेट पोलीस ठाणे गाठले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com