Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादातून अमय सावे यांना लोखंडी रॉडने डोक्यात व माथ्यावर मारहाण करून जखमी केले होते.
Crime

crime

Esakal

Updated on

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव खंडेवाडी येथे दिनांक 10 रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता बाभुळगाव ते नायगव्हाण रोड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादातून फिर्यादी अमय अजित सावे, (वय-35 वर्षे), व्यवसाय RCM प्लांट, रा. अंजली कॉम्प्लेक्स, खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर यांना लोखंडी रॉडने डोक्यात व माथ्यावर मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 569/2026, कलम 109(1), 118(1), 115(2), 3(5) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील फरार असलेल्या तिघांना बिडकीन पोलिसांनी शोध घेऊन अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीजवळून ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com