पाल ठोकून राहणाऱ्या मजुरांना किराणा साहित्य

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

बीड जिल्ह्यातील बिलाल मोहल्ला कमिटीचे रियाज काझी यांनी साखर, शेंगदाळे, हरभरा डाळ, तेल, डेटॉल साबण, चहा पत्ती, डाळी, मसाले आदी किराणा साहित्य वाटप केले आहे. 

माजलगाव : शहरातील गोरगरिब, वंचित, उपेक्षीतांना, हातावर पोट असणा-या मजुरांना किराणा साहित्याची व अन्नधान्याची कमतरता भासु नये यासाठी बिलाल मोहल्ला कमीटीचे रियाज काझी यांनी साखर, शेंगदाळे, हरभरा डाळ, तेल, डेटॉल साबण, चहा पत्ती, डाळी, मसाले आदी किराणा साहित्य वाटप केले आहे. 

बीड येथील शशिकला गोपाल राठी यांच्या मार्फत गंगाभिषण बियाणी संस्थेच्या माध्यमातून शहराभोवती पाल ठोकून राहणाऱ्या मजूरांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. तर, काही मजूरांना जेवणासाठी भाजपचे भगीरथ बियाणी व डॉ. लक्ष्मण जाधव सतर्कता दाखवत आहेत. बंदच्या काळात पोलिसांच्या चहा - नाष्ट्याची देखील त्यांनी व्यवस्था केली. 

हेही वाचा - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

निराधारांच्या जेवणासाठी मदत ग्रुपचा पुढाकार 
बीड : रस्त्यावर असलेल्या निराधार व निराश्रीतांना जेवण मिळावे यासाठी येथील मदत ग्रुपने पुढाकार घेतला आहे. दत्ता प्रभाळे, संगमेश्वर आंधळकर व त्यांचे सहकारी दात्यांच्या मदतीने जेवण तयार करुन ते गरजूंना पोच करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribute groceries to laborers