
कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे भोकर शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवे रस्त्यावर मोलमजूरी करुन जीवन जगणाऱ्या ५० ते ६० कुटूंब असलेल्या मजूरांना रस्त्यालगत पाल ठोकून आहेत.
पालावरील मजूरांना खासदार चिखलीकरांकडून धान्य वाटप
नांदेड : राहयला घर नाही, हाताला काम नाही, खायला अन्न नाही अशा त्रिवेनी अवस्थेत कोरोनाशी लढा देणार्या भोकर शहराच्या बाहेर पाल मारुन जीवन जगणार्या गरीब मजूरांना नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गुरुवारी मजूरांच्या पालावर जावून त्यांना अन्नधान्याचे वाटप करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या सोबत असल्याचा संदेश दिला आहे.
पन्नास ते साठ मजूरांचा पाल
कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे भोकर शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवे रस्त्यावर मोलमजूरी करुन जीवन जगणाऱ्या ५० ते ६० कुटूंब असलेल्या मजूरांना रस्त्यालगत पाल ठोकून आहेत. रस्त्याचे काम बंद असल्यामुळे हाताला काम नाही, खायला अन्न नाही अशा अवस्थेत जगणाऱ्या या गरीब कुटूंबांना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलासा देण्यासाठी त्यांच्या पालमध्ये राहणाऱ्या मजूरांच्या वस्तीवर जावून त्यांना पाच किलो तांदूळ, पाच किलो गहू, दाळ, तेल, साबण आदी जीवनाश्यक वस्तुचे कीटचे वाटप केले.
हेही वाचा....मायेचा निवारा ...आणि माणुसकीची प्रचिती
उपासमार होणाऱ्यांना धान्य वाटप
यावेळी भोकरचे तहसिलदार, उपजिल्हाधिकारी पवन चांडक, भाजपचे दिलीप सोनटक्के, सुरेश राठोड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. जीवनाश्यक वस्तुने भरलेले अन्नधान्याचे पोते घेवून खासदार चिखलीकर हे गुरुवारी (ता. नऊ) सकाळी भोकर शहरात दाखल झाले. भोकर शहरालगत हायवे रस्त्याचे काम करणाऱ्या बाहेरगांवच्या मजूरांची उपासमार होत असल्याचे समजताच खासदार चिखलीकर यांनी त्या मजूरांच्या पालावर जावून त्यांना धान्याचे वाटप केले. त्यानंतर तहसिल कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेवून कोरोनासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.
हेही वाचलेच पाहिजे.....तेलंगणाशी जोडणारी सीमा गावकऱ्यांनी केली बंद
मास्क व सॅनेटायझर देवू
ग्रामीण भागात घरोघरी जावून कोरोना संदर्भात माहिती जमा करणार्या आशा वर्करला अद्याप मास्क व सॅनेटरायझरचे वाटप करण्यात आले नसल्याची माहिती बीडीओ रामोड यांनी बैठकीत दिली. त्यावेळी खा.चिखलीकर यांनी तुमच्या कार्यालयाचा व्यक्ती नांदेडला माझ्याकडे पाठून द्या माझ्याकडून त्यांच्यासोबत मास्क व सॅनेटायझर पाठवून देण्याचे मान्य केले. ग्रामीण भागातील खेडेगांवात सर्व ग्रामसेवकांना सूचना करुन गावाची साफसफाई करुन घेवून जंतूनाशक फवारणी करण्यास सांगितले.
राशनकाडे नसणाऱ्यांना धान्य देणार
ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत असा कुटूंबांना धान्य पुरविण्यासाठी आपण तयार आहोत. त्यासाठी प्रशासनाने असे किती लोक आहेत त्यांची यादी करुन मला सांगावे. अन्नधान्य पुरवठा करण्याची व्यवस्था माझ्याकडून करण्यात येईल असे खा.चिखलीकर यांनी सांगितले. तहसिल कार्यालयातील आढावा बैठक संपल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालय व पोलिस ठाण्यास भेट देवून कर्मचार्यांना मास्क व सॅनेटायझरचे वाटप केले. कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी रस्त्यावर उतरुन अहोरात्र काम करणार्या पोलिस, महसूल, वैद्यकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचे श्री. चिखलीकर यांनी आभार मानले. भोकर येथील पत्रकारांनाही मास्क व सॅनेटायझरचे त्यांनी वाटप करुन संकट काळात तुमचा खासदार म्हणून सदैव जनतेच्या सेवेत तयार असल्याचेही मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.