esakal | ‘त्या’ २५ संशयितांच्या अहवालाकडे जिल्हाप्रशासनाचे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

जिल्ह्यातील असंख्य नागरिक कामाच्या शोधात राज्यासह परराज्यात गेलेले आहेत. काही परत आले असून, काही रस्त्यातच अडकून पडले आहेत. त्या प्रत्येकाची रोज आठ ते दहा जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी औरंगाबादला पाठविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत नांदेड जिल्हा कोरोनामुक्त जिल्हा म्हणून ओळखला जात आहे.

‘त्या’ २५ संशयितांच्या अहवालाकडे जिल्हाप्रशासनाचे लक्ष

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : नांदेड जिल्‍ह्यात हजारो कामगार, नौकरदार कामासाठी राज्यासह इतर राज्यात स्थलांतरीत झाले होते. परंतु लॉकडाऊनची घोषणा होताच अनेकजण गावी परत आले आहेत. गावी परत आलेल्या प्रवाशी व्यक्तींची रोज नव्याने तपासणी करण्यात येत आहे. गुरुवारी (ता.नऊ एप्रिल २०२०) जिल्ह्यातील २५ संशयितांच्या घशातील लाळेचे नमुने (स्वॅब) घेऊन ते औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

यापूर्वी सोमवारी (ता. सहा एप्रिल २०२०) दिल्ली येथुन आलेल्या दोन आणि इंडोनेशिया येथुन शहरात आलेल्या एकुण १२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह प्राप्त झाले होते. त्यानंतर बुधवारी (ता.आठ एप्रिल २०२०) जिल्ह्यातुन एकही संशयित व्यक्ती सापडली नव्हती. मात्र गुरुवारी अचानक २५ संशयित सापडले असून, त्यांचे स्वॅब औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, शुक्रवारी (ता.१० एप्रिल २०२०) त्या सर्वांचे अहवाल प्राप्त होतील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
हेही वाचा - प्रवासी नागरिकांनी माहिती द्यावी

66 हजारापेक्षा अधिक स्थलांतरीत गावाकडे परतले

नांदेड जिल्ह्यातील अनेक गावे, वाडी, तांडे, वस्त्यावरील नागरीकांच्या हाताला काम मिळत नसल्याने व पाण्याची टंचाईमुळे हजारो लोक काही महिण्यासाठी जवळच्या राज्यात व मोठ्या शहरात स्थलांतरीत होतात. यावर्षी देखील ६६ हजारापेक्षा अधिक बेरोजगार मजुर कामासाठी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, तेलंगणा, आंध्रा अशा विविध ठिकाणी स्थलांतरीत झाले होते. लॉकडाऊन होताच हे नागरीक गावाकडे पोहचली आहेत.

 हेही वाचले पाहिजे- डॉक्टरांच्या सेवेप्रती असेही ऋण

लॉकडाऊनमुळे हजारो मजुर रस्त्यात 

काही कामगार उशिरा निघाल्याने लॉकडाऊनमुळे रस्त्यातच आडकली आहेत. अशा नागरीकांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढु नये म्हणून त्यांना आहे त्याच ठिकाणी थांबण्यासाठीचा सल्ला देण्यात येत आहे. त्यांच्या जेवणाची व राहण्याची शासन व्यवस्था करत आहे. जिल्‍ह्यात आलेल्या प्रवाशांची जिल्हा प्रशानाकडून बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. तपासणी करण्यात आलेल्या प्रवाशी नागरीकांपैकी रोज आठ ते दहा संशयितांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी औरंगाबादला पाठविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत नांदेड जिल्हा कोरोनामुक्त जिल्हा म्हणून ओळखला जात आहे.
 

loading image