प्रवासी नागरिकांनी माहिती द्यावी

कृष्णा जोमेगावकर
Wednesday, 8 April 2020

जी व्यक्ती, परदेशातून, परराज्यातून व परजिल्ह्यातून प्रवास करुन आली आहे. परंतू सदर व्यक्तीने स्वत:हून केलेल्या प्रवासाची माहिती प्रशासनास दिली नाही. प्राथमिक तपासणी देखील करुन घेतली नाही. अशा व्यक्तींनी किंवा अशा व्यक्तींना ओळखणाऱ्या नजीकच्या व्यक्तींनी संबंधीत तहलिसदारांना दूरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे संबंधितांची माहिती कळवावी. 

नांदेड : जी व्यक्ती परदेशातून, परराज्य व परजिल्ह्यातून प्रवास करुन आली आहे, परंतू स्वत:हून केलेल्या प्रवासाची माहिती प्रशासनास दिली नाही. तसेच प्राथमिक तपासणी देखील करुन घेतली नाही, अशा व्यक्तींनी किंवा अशा व्यक्तींना ओळखणाऱ्या नजीकच्या व्यक्तींनी त्यांची माहिती संबंधीत तहलिसदार यांना दूरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे कळवावी, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा‍ जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिले आहेत.

साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना (कोव्हिड १९) या विषाणमुळे पसरत चालेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा  १८९७ ता. १३ मार्च पासून लागू करुन खंड दोन, तीन व चार मधील तरतुदीनुसार ता. १४ मार्च रोजी अधिसुचना निर्गमीत केली आहे.

हेही वाचा....मेहनतीला रान मोकळ हायं, पण ‘फळा’च काय...?

प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषित केले आहे. त्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात परदेशातून, परराज्यातून, जिल्ह्याच्या बाहेरुन जिल्ह्यात प्रवास करुन आलेल्या नागरिकांची माहिती घेण्यात आली आहे.

हेही वाचलेच पाहिजे.....पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना तयारीचा आढावा

प्रवासी नागरिकांनी माहिती द्यावी
जी व्यक्ती, परदेशातून, परराज्यातून व परजिल्ह्यातून प्रवास करुन आली आहे. परंतू सदर व्यक्तीने स्वत:हून केलेल्या प्रवासाची माहिती प्रशासनास दिली नाही. प्राथमिक तपासणी देखील करुन घेतली नाही. अशा व्यक्तींनी किंवा अशा व्यक्तींना ओळखणाऱ्या नजीकच्या व्यक्तींनी संबंधीत तहलिसदारांना दूरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे संबंधितांची माहिती कळवावी. 

कोरोना जनजागृती अभियानाचे आयोजन
कोरोना विषाणुचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्‍यूरो नांदेडच्‍यावतीने जिल्‍ह्यातील ग्रामीण भागामध्‍ये जनजागृती करण्‍यात येत आहे. ता. आठ एप्रिल ते ता. १३ एप्रिल दरम्‍यान आयोजित करण्‍यात आलेल्‍या ऑडीयो पब्‍लीसीटी कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून नांदेड, कंधार, नायगाव, लोहा, अर्धापुर तालुक्‍यातील साठ गावांमध्‍ये जनजागृती मोहिम राबविण्‍यात येणार आहे. या मोहिमेच्‍या माध्‍यमातून घरी थांबणे, किराणा आणि जिवनावश्‍यक वस्‍तुंचा साठा न करने, अति महत्‍वाच्‍या वेळी बाहेर पडणे, शेती उपयोगी कामे करता येणे, गर्दी टाळणे, समाज माध्‍यमांवरिल अफवांना बळी पडु नका तसेच आरोग्‍य विषयक संदेश गावकऱ्यांना देण्‍यात येत आहेत.   

या गावात होणार जनजागृती
या अभियान ता. १३ एप्रिल पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा दरम्‍यान राबविण्‍यात येणार आहे. या अभियानात नांदेड तालुक्‍यातील धनेगाव, बळीरामपुर, गोपाळचावडी, बाभुळगाव,गुंजडेगाव, ढाकणी, वाजेगाव, काकांडी, तुप्‍पा, किक्‍की, राहेगाव, भायेगाव, विष्‍णुपुरी, पासदगाव, सुगाव, वांगी, कासापरखेडा, पासदगाव, पिपळगाव, कोटीतिर्थ, वाघी, नाळेश्‍वर, सोमेश्‍वर, राहटी, जैतापुर, पिंपरणवाडी, ढोकी, नागापुर, राहटी, पुणेगाव या गांवाचा समावेश आहे. लोहा तालुक्‍यातील किवळा, टेळकी, मारतळा, कहाळा, धनगरवाडी, जानापुरी, सोनखेड, बोरगाव, कारेगाव, हरबळ, दगडगाव, लोहा, दापशेड उस्‍माननगर या गावांमध्‍ये कोरोना विषयी  जनजागृती करण्यात येणार आहे. 

अर्धापूर तालुक्यातील गावे
अर्धापुर तालुक्‍यातील देगाव, मालेगाव, कामठा, गणपुर डेरला, पिंपळगाव, देगाव येळेगाव या गावांचा समावेश करण्‍यात आला आहे. मुदखेड तालुक्यातील आमदुरा, इजळी, चिकाळा, मुगट, मुदखेड, ब्राम्‍हणवाडा या गावांमध्‍ये जनजागृती करण्‍यात येणार आहे.तपासणी करुन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सुलभ होईल. तसेच सर्व संबंधीत तहलिसदार यांनी स्वत: या कामी लक्ष देऊन त्यांच्या स्तरावरुन अशी माहिती संकलित करावी. त्यांच्याकडील व जनतेतून प्राप्त होणारी माहिती दररोज उपजिल्हाधिकारी (लसिका) श्रीमती संतोषी देवकुळे (भ्रमणध्वनी क्र. ९४२२९६१०९०) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यावी, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा‍ जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी निर्गमीत केले आहेत.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travelers should provide information, nanded news